आपला आणि कामाचा नेता हीच खरी अजितदादांची ओळख होती, पी. एन. रणवरे

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण /जिंती दि २२ जुलै २०२६):-अजित दादांनी आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य जनतेसाठी व्यतित केले. सर्वसामान्य जनता केंद्रभूत मानून त्यांनी जनतेची कामे केली व सर्व सामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण करून स्वतःचा आगळावेगळा ठसा उमटवला. सतत कामात व्यस्त असणारा हा नेता आजही जनतेला हवाहवासा वाटतो अजितदादा म्हणजे सर्वसामान्यांची नस ओळखून काम करणारा व कामाला न्याय देणारा असाच नेता होता. आपला आणि कामाचा नेता हीच खरी अजित दादांची ओळख होती असे स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य पी. एन. रणवरे यांनी जिंती ता. फलटण येथे रयत शिक्षण संस्थेच्या श्री जितोबा विद्यालय येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मत व्यक्त केले.

यावेळी अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य राजेंद्र दौलतराव रणवरे हे होते. व्यासपीठावर आदिनाथ अकॅडमीचे संचालक प्रा.माधव लांडगे, एम. एन. रणवरे, नवनाथ रणवरे जगदेवराव रणवरे मुख्याध्यापिका सौ जाधव एम. डी. ज्येष्ठ शिक्षक व समुपदेशक ताराचंद्र आवळे, सौ. संध्या लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. पी. एन. रणवरे पुढे म्हणाले की अजितदादा सतत कामात व्यस्त असणारे एक नेतृत्व होऊन गेले. जनतेची कामे कशी करावीत व नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणून अजितदादा यांच्याकडे पाहिले जाते.अजितदादांनी केलेली कामे पाहिले की मन थक्क होऊन जाते व कामाची प्रेरणा व ऊर्जा मिळते.

Screenshot


यावेळी आदिनाथ अकॅडमीचे संचालक प्रा. माधव लांडगे, एम.एन.रणवरे ज्येष्ठ शिक्षक व समुपदेशक ताराचंद्र आवळे यांची भाषणे झाली.
सुरुवातीला अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली
आदिनाथ अकॅडमीच्या वतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप,विद्यालयास सहा डस्टबिन व अजितदादांची प्रतिमा भेट देण्यात आली. या स्तुत्य व दातृत्वाच्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ शिक्षक व विद्यार्थी यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जेष्ठ शिक्षक व समुपदेशक ताराचंद्र आवळे यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षक जीवन देशमुख यांनी केले तर आभार उपशिक्षक अंकुश सोळंकी यांनी मांनले. कार्यक्रमास विद्या जमदाडे,अमोल जाधव,शाहीन हन्नुरे, मधुकर जगताप,अर्चना सोनवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिंती गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!