महाइनडोअर क्रिकेट असोसिएशन आयोजितजुनिअर इनडोअर क्रिकेट राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धा जळगावात!दक्षिण आफ्रिकेच्या स्वप्नासाठी सुवर्णसंधी१६ व १७ ऑगस्टला जळगावात रंगणार महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनची भव्य स्पर्धा१३, १५ व १७ वर्षांखालील खेळाडूंना राष्ट्रीय आणि जागतिक स्तर गाठण्याची मोठी संधी

फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई दि ८ ऑगस्ट २०२६): महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सन २०२६-२७ मधील जुनिअर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी इनडोअर क्रिकेट स्पर्धा येत्या १६ व १७ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे रंगणार आहे. या स्पर्धेतून निवड होणारे खेळाडू इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशन (IISF) आयोजित राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंनाच २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ज्युनिअर वर्ल्ड इनडोअर क्रिकेट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. हि महाराष्ट्रातील उदयोन्मुख इनडोअर क्रिकेटपटूंसाठी सुवर्णसंधी आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल
ही स्पर्धा केवळ राज्य अजिंक्यपदापुरती मर्यादित नसून, महाराष्ट्रातील गुणवंत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यासपीठावर पोहोचवणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांतील खेळाडूंमध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

तीन वयोगटांत निवड प्रक्रिया
या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुला-मुलींसाठी राज्य अजिंक्यपद स्पर्धा, तर १३ व १७ वर्षांखालील मुला-मुलींसाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित वयोगट पूर्ण न झालेले खेळाडूच पात्र ठरतील.

नोंदणीची अंतिम मुदत; WhatsApp वरच प्रवेश
जिल्हा संघांनी आपले प्रवेश अर्ज १० ऑगस्ट २०२६ पूर्वी WhatsApp (९८६९१३५०८३) वर पाठवणे बंधनकारक आहे. खेळाडूंच्या वयाच्या पडताळणीसाठी आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार असून ते नसल्यास शालेय बोनाफाईड प्रमाणपत्र स्वीकारले जाईल. सर्व खेळाडूंनी जिल्ह्याच्या अधिकृत गणवेशातच मैदानात उतरावे लागेल. प्रत्येक महिला संघासोबत महिला व्यवस्थापिका असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक संघात १२ खेळाडू, १ प्रशिक्षक आणि १ व्यवस्थापक अशा एकूण १४ सदस्यांनाच परवानगी असेल.

स्थानिक संपर्क
स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी श्री. दीपक आर्डे (९४२०६०९०६७), श्री. किशोर चौधरी (७७९६४७९९९७) आणि श्री. देवदत्त पाटील (९४२२९७८९९८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थापक सरचिटणीसांचे आवाहन
महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक सरचिटणीस बाळासाहेब (बाळ) तोरसकर (९८६९१३५०८३) व संस्थापक चेअरमन क्षितीज वेदक यांनी राज्यातील सर्व जिल्हा संघटनांनी वेळेत प्रवेश अर्ज सादर करून या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जळगावातील ही स्पर्धा अनेक युवा खेळाडूंसाठी राष्ट्रीय आणि जागतिक इनडोअर क्रिकेटच्या दारात प्रवेश मिळवून देणारी ठरणार आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!