माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधन झाल्याने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व डॉ. संजय पाटील यांची सांत्वनपर घेतली भेट

फलटण टुडे वृत्तसेवा ( कोल्हापूर दि १४ ऑगस्ट २०२६): शिक्षणमहर्षी, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तसेच बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ.ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे ४ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
या दुःखद प्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कोल्हापूर येथे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व डॉ. संजय पाटील यांची सांत्वनपर भेट घेतली

Screenshot

. यावेळी त्यांनी डॉ. डी.वाय.पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. डॉ.डी.वाय.पाटील यांनी शिक्षण क्षेत्रासह सामाजिक व सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या कार्याचा ठसा महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत उमटला आहे. त्यांच्या निधनाने एक दूरदृष्टीचे, कर्तृत्ववान व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या सांत्वनपर भेटीप्रसंगी डॉ.पार्श्वनाथ राजवैद्य, हेमंत रानडे, प्राचार्य डॉ.पी.एच.कदम सर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!