दि हॉकी सातारा संघटनेच्या कु निकिता वेताळ, कु अनुष्का केंजळे, कु अनुष्का चव्हाण व कु शिफा मुलानी या महिला हॉकी खेळाडूंची महाराष्ट्राच्या जुनियर हॉकी संघात निवड

डावी कडून शिफा मुलानी, अनुष्का चव्हाण, निकिता वेताळ, अनुष्का केंजळे

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि१४ ऑगस्ट २९२६)-
हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र पुणे यांच्यावतीने ध्यानचंद हॉकी स्टेडियम पिंपरी चिंचवड पुणे येथे निवड चाचणीचे आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेपूर्व निवडचाचणी साठी दि हॉकी सातारा संघटनेच्या महिला हॉकी खेळाडू कु समृद्धी बनकर, कु श्रद्धा यादव, कु सिद्धी केंजळे, कु आरोही पाटील, कु मानसी पवार, कु गायत्री खरात, कु तेजस्विनी कर्वे, कु ऋतिका घाडगे कु निकिता वेताळ कु अनुष्का केंजळ कु अनुष्का चव्हाण कु शिफा मुलानी यांनी सहभाग नोंदवला.

Screenshot


निवड चाचणी दरम्यान कु निकिता वेताळ कु अनुष्का चव्हाण व अनुष्का केंजळे कु शिफा मुलानी यांनी उत्कृष्ट खेळ करत महाराष्ट्राच्या हॉकी संघामध्ये निवड झाली आहे.सदर राष्ट्रीय हॉकी स्पर्धा मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम पिंपरी चिंचवड, पुणे येथे दिनांक 17 ते 23 ऑगस्ट 2026 या दरम्यान आयोजित होणार आहेत. सर्व महिला हॉकी खेळाडू मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत.

Screenshot


या सर्व खेळाडूंना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा महाराष्ट्राच्या संघाचे ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक श्री महेश खुटाळे व एन आय एस हॉकी प्रशिक्षक श्री सचिन धुमाळ प्रशिक्षण देत आहेत. तसेच प्रशिक्षणामध्ये सहाय्यक म्हणून श्री बी बी खुरंगे , सहाय्य करत आहेत.

सर्व निवड प्रक्रिया हॉकी महाराष्ट्र संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा श्री मनोज भोरे सर, श्री सागर ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आली. त्यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.



सर्व प्रशिक्षक व खेळाडूंचे विधान परिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराजसाहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकरसाहेब ,महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकरसाहेब, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समिती चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे सर, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे सर व दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष श्री बाहुबली शहा, व इतर पदाधिकारी श्री पंकज पवार ,श्री प्रवीण गाडे,श्री महेंद्र जाधव ,श्री सचिन लाळगे व माजी राष्ट्रीय खेळाडू श्री सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!