जैनकवाडी येथे प्लस पोलिओ चा शुभारंभ करताना मान्यवर
फाकतां टुडे वृत्तसेवा ( बारामती दि २३ नोव्हेंबर २०२६):-
जैनकवाडी येथे प्लस पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले
जैनकवाडी च्या सरपंच सौ.धनश्री संतोष लोखंडे यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी आरोग्य अधिकारी विकास कापसे, अशा स्वयंसेविका ललिता सूर्यवंशी,सामाजिक कार्यकर्ते संतोष लोखंडे व ग्रामस्थ उपस्तीत होते.

आरोग्य उपकेंद्र निंबोडी अंतर्गत येणाऱ्या जैनकवाडी गावामध्ये उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. गावातील एकही बालक पोलिओच्या डोसपासून वंचित राहू नये,या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
पोलिओमुक्त देश व समाज घडविण्यासाठी सर्व स्तरारातील नागरिकांनी आपल्या ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना जवळच्या लसीकरण केंद्रावर नेऊन पोलिओचा डोस पाजावा, असे आवाहन विद्यमान सरपंच- सौ.धनश्री लोखंडे यांनी यावेळी केले
आभार संतोष लोखंडे यांनी मानले

