धनादेश देताना करताना लडकत बंधू व शिक्षक
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ५ नोव्हेंबर २०२६):-
सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचे भान जपत लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन, बारामती यांच्या वतीने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता कक्षास एक लाख रुपयांचा धनादेश बारामती चे तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला .
यावेळी ग्राम महसूल अधिकारी जळोची मयुरेश वाघमोडे ,
संस्थेचे अध्यक्ष नामदेव लडकत, सचिव गणेश लडकत, खजिनदार दत्तात्रय लडकत, संचालिका शुभांगी लडकत व प्रियंका लडकत प्राचार्य रामचंद्र वाघ व तानाजी गवळी व इतर मान्यवर उपस्थित होते
शिक्षणाबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणाऱ्या संस्थेने दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या गरजू नागरिकांना मदतीचा हात देत समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या मदतीसाठी हातभार लागावा, या उदात्त हेतूने संस्थेने ही आर्थिक मदत सुपूर्द केल्याचे प्रा नामदेव लडकत यांनी सांगितले.
लडकत स्कुल ऑफ फौंडेशन चा दुष्काळ ग्रस्त साठी सदर उपक्रम कौतुकास्पद असून अनेक संस्थांनी सुद्धा या कामे पुढे येण्याची आव्हान तहसीलदार स्वप्निल रोकडे यांनी केले
