दुग्धप्रक्रिया अभ्यास साठी सूक्ष्मजीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांची बारामती दूध संघास अभ्यास भेट

सूक्ष्मजीव शास्त्र विभाग च्या विद्यार्थ्यांची नंदन डेअरी ला भेट

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ५ नोव्हेंबर २०२६):-
बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ बारामती कार्यालय माळेगाव येथील नंदन डेअरी व पशुखाद्य विभाग येथे
दूध प्रक्रियांचे प्रत्यक्ष ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आणि सूक्ष्मजीवशास्त्राच्या व्यावहारिक उपयोगांचा अनुभव घेण्याच्या उद्देशाने विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील द्वितीय वर्ष बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांनी नंदन डेअरी, माळेगाव बुद्रुक येथे अभ्यासभेट दिली.

या प्रसंगी दूध संघाचे चेअरमन किशोर फडतरे, व्हाईस चेअरमन पुरुषोत्तम गाढवे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश राणे, उपमहाव्यवस्थापक अमोल चव्हाण, कामगार प्रतिनिधी महेंद्र काटकर व महाविद्यालयाचे सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. नीलिमा पेंढारकर , सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा. गीतांजली पवार आणि डॉ. अमरजा भोसले आदी उपस्तीत होते.
या अभ्यासभेटीदरम्यान विद्यार्थ्यांना दूध संकलनापासून ते प्रक्रिया, पॅकेजिंग आणि गुणवत्ता नियंत्रणापर्यंतच्या विविध टप्प्यांची माहिती घेण्याची संधी मिळाली. दूध व दुग्धजन्य पदार्थांची सुरक्षितता, स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे महत्त्व, सूक्ष्मजीवांमुळे होणारे संभाव्य दूषितीकरण आणि अन्नगुणवत्ता राखण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या उपाययोजना यांविषयी विद्यार्थ्यांना औद्योगिक दृष्टिकोनातून समजून घेता आले. तसेच दुग्धप्रक्रिया उद्योगामध्ये सूक्ष्मजीवशास्त्राचे असलेले महत्त्व आणि या क्षेत्रातील रोजगार व करिअरच्या संधींचीही ओळख झाली.
आभार सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. नीलिमा पेंढारकर यांनी मानले

चौकट: स्व: अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाने नेत्रदीपक वाटचाल केली असून राज्यातील आदर्श व आर्थिक शिस्त असलेला दूध संघ व तालुका निहाय सर्वात जास्त दूध संकलन असणारा बारामती तालुका दूध संघ म्हणून ओळख राज्यात आहे:
किशोर फडतरे
चेअरमन बारामती तालुका दूध संघ


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!