
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २८ सप्टेंबर २०२५):-सासवड चे राजे गटाचे यूवा उद्योजक तथा युवा नेते अमोल शिवाजीराव रासकर यांची फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वीकृत संचालक पदी निवड करण्यात आली आहे.
नुकतीच फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या सभेमध्ये फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक
निंबाळकर यांनी युवा नेते अमोल रासकर यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवड करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.
अमोल रासकर यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, मा महाराष्ट्र खो- खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण संस्थांचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटणचे माजी आमदार दिपकराव चव्हाण, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर, सचिव शंकराव सोनवलकर, तसेच सर्व संचालक यांनीही अभिनंदन केले आहे.



