त्रिवेणी ऑइल अँड फूड ला देशातील बँक अधिकाऱ्यांची भेट

त्रिवेणी ऑइल अँड फूड कंपनीस भेट देताना देशातील बँक अधिकारी व सोबत शुभांगी चौधर, वसंतराव चौधर

महिला रोजगार, उत्पादन व विक्री ची घेतली माहिती

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १३ ऑक्टोबर २०२६):-
बारामती रुई येथील त्रिवेणी ऑईल ॲन्ड फूड प्रॉडक्ट्स या कंपनीच्या युनिट ला मंगळवार दि.१३ ऑक्टोबर रोजी संपुर्ण भारतातून विविध राज्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन कामकाज ची माहिती घेतली.


या प्रसंगी बँक ऑफ इंडियाचे टिम ट्रेनिंग लीडर महेश कांबळे,विपणन अधिकारी गोयंक ठाई व त्रिवेणी ऑइल अँड फूड प्रॉडक्ट कंपनीच्या संचालिका शुभांगी चौधर, वसंतराव चौधर, विनायक चौधर, गौरव चौधर, साक्षी चौधर, व इतर ज्युनिअर व सिनिअर अधिकारी उपस्तीत होते.
महिलांनी उत्पादन क्षेत्रात येऊन अनेक महिलांना रोजगार देऊन, उत्पादन सुरू करून विक्री केल्यास महिला आर्थिक स्वालंबी होतील व घेतलेले कर्ज वेळेत फेडणे व कंपनी विस्तार करणे हे महिला सहज पणे करू शकतात व त्रिवेणी उद्योग समूह याचे उदाहरण असल्याचे टीम ट्रेनिंग लीडर महेश कांबळे यांनी सांगितले.


ग्रामीण भागातील महिला नी उद्योग व्यवसाय मध्ये पुढे यावे या साठी केंद्र शासन व बँक सहकार्य करेल अशी ग्वाही विपणन अधिकारी गोयंक ठाई यांनी दिली.
त्रिवेणी ऑईल ची स्थापना , वाढता विस्तार व चांगल्या गुणवत्तेचे तेल बियाणे, नैसर्गिक तेल काढण्याची प्रक्रिया, पॅकेजिंग, मार्केटिंग, शुद्धतेचे नियम व त्रिवेणी चा प्रवास ची माहिती संचालिका सौ. शुभांगी चौधर यांनी सांगितले.
आभार विनायक चौधर यांनी मानले .


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!