
फलटण टुडे वृत्तसेवा :-फलटण-येथील प्रसिद्ध व्यापारी दत्तात्रय विठ्ठल भांबुरे यांच्या पत्नी सौ ज्योती भांबुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले
व्यापारी योगेश भांबुरे व फलटण संत नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष करण भांबुरे यांच्या त्या मातोश्री होत्या
सौ ज्योती दत्तात्रय भांबुरे यांची अंत्ययात्रा त्यांच्या कोळकी येथील राहत्या घरापासून काढण्यात आली शिंपी गल्ली येथे अंत्यदर्शनासाठी थांबवण्यात आल्या नंतर पार्थिवावर फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पच्छात दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे
यावेळी फलटण शहरातील व्यापारी,मित्रपरिवार, समाज बांधव,फलटण शहर व तालुक्यातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते
सावडणे विधी उद्या गुरुवार दिं.2ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० वाजता फलटण वैकुंठ स्मशानभूमी येथे होणार असून दशक्रिया विधी गुरुवार दिं.९ ऑक्टोबर रोजी फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे होईल

