
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ३ डिसेंबर २०२६):-फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यता प्राप्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषि महाविद्यालय, फलटण येथे जर्मनीच्या मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.

महाविद्यालयाच्या सदिच्छा भेटी दरम्यान जर्मनीतील प्रसिद्ध उद्योग समूहाचे श्री. थोर्स्टन विल्सडॉर्फ यांच्या सोबत पुणे येथील अमेया पालेकर, मृण्मयी कोष्टी, श्री. ऋषी जैन, मे. गव्हर्निंग कॉन्सिल सदस्य श्री. भोजराज नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर उपस्थित होते.

सदिच्छा भेटीदरम्यान मान्यवरांनी महाविद्यालयातील विविध विभागांना तसेच कृषि संबंधित राबविण्यात येणाऱ्या विविध कृषीपूरक व्यवसाय आधारित प्रकल्प व उपक्रमांना भेट देऊन सविस्तर माहिती घेतली तसेच दोन्ही महाविद्यालयातील चालू असलेल्या शैक्षणिक व शेतकरी पूरक उपक्रम संबंधित माहिती घेऊन महाविद्यालयातील सर्व विभागांशी संवाद साधला, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत आहेत असे कौतुकास्पद उद्गार मान्यवरांनी व्यक्त केले.


