
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १२ जानेवारी २०२६):– १जानेवारी ते ३१ जानेवारी अखेर प्रतिवर्षी राष्ट्रीय सुरक्षा मोहीम राबवली जाते. राज्य परिवहन (एस.टी.)फलटण आगारात सुरक्षितता अभियान दि 1.1.26 ते 31.1.26 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन श्री. गायकवाड सर, विभागीय भांडार अधिकारी तसेच श्री. धायगुडे साहेब, सहा. पोलिस निरीक्षक यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना श्री.गायकवाड साहेब यांनी सुरक्षितता ही काळाची गरज असून सुरक्षित प्रवास हे एसटी महामंडळाचे ब्रीदवाक्य असल्याचे नमूद करून सर्व चालक वाहक कार्यशाळा कर्मचारी यांनी सुरक्षितता नियमांचे पालन करून प्रवाशांना सुरक्षित सेवा द्यावी असे आवाहन केले.सहा. पोलीस निरीक्षक श्री.धायगुडे साहेब यांनी वाहन चालवताना रस्त्यावरील इतर वाहने व पादचारी यांची काळजी घेऊन वाहन चालवावे असे प्रतिपादन केले.सुरक्षितता अभियानाच्या अनुषंगाने आगारातील चालक- वाहक ,यांत्रिक तसेच पर्ववेक्षकीय कर्मचारी यांना सुरक्षितता मोहिमेविषयी प्रतिज्ञा देण्यात आली. उपस्थित चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आगार व्यवस्थापिका सोफिया मुल्ला मॅडम, स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री.लोंढे साहेब, वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे साहेब,सहा. वाहतूक निरीक्षक निरज अहिवळे साहेब, बहुसंख्य चालक वाहक व कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते.



