मुधोजी हायस्कूल येथे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात व उत्साहात साजरा ……..

प्रभातफेरीच्या माध्यमातून जय भवानी जय शिवाजी घोषणांनी परिसर दुमदुमला

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि २० एप्रिल २०२६):-
फलटण येथील फलटण एज्यूकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव (शिवजयंती) अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शाळेत विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी प्रशालेतून “प्रभातफेरी” ने सुरुवात झाली सर्वांनी जय भवानी जय शिवाजी अश्या घोषणा देत महावीर स्तंभ – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आल्यानंतर फलटण एज्यूकेशन सोसायटी चे कुटुंब प्रमुख , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण एज्यूकेशन सोसायटी चे सेक्रेटरी मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते नारळ वाढऊन पुष्पहार अर्पण करून शिवरायांची आरती करण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर , विद्यमान नगरसेवक विकास काकडे , तपासणी अधिकारी श्री सुधीर अहिवळे, प्राचार्य, उपप्राचार्य , पर्यवेक्षक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी , पालक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये:
वेशभूषा व लेझीम नृत्य : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभुषेत शिक्षक मिलिंद नलावडे , जिजाऊ माँसाहेब यांच्या वेशभुषेत शिक्षिका सौ वैशाली रसाळ आणि बाल संभाजीराजे यांच्या वेशभूषेत विद्यार्थी प्रणव नाळे यांनी अशा ऐतिहासिक व्यक्तिरेखांची वेशभूषा केली होती, ज्यामुळे वातावरण भगवे व शिवमय झाले.

यानंतर प्रशालेतील इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थिनींनी श्रीमंत संजीवराजे यांच्या उपस्थितीत लेझीम नृत्य सादर करून सर्व वातावरण दणाणून शिवमय व मंत्रमुग्ध केले यावेळी अनेकानी या लेझीमच्या ठेक्यावर नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही यावेळी फलटणकर शिवप्रेमिनी जोरदार प्रतिसाद देत या नृत्याला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली . वरील विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक तुषार मोहिते व सहकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

यानंतर ही “प्रभातफेरी” भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक – महावीर स्तंभ – आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक चौक येथे पोहोचल्या नंतर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , महावीर स्तंभ व आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास प्रशालेचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे , फलटण शहर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष हरीश काकडे , नगरसेविका सौ लताताई मदने , नगरसेवक श्री विकास काकडे , तपासणी अधिकारी श्री सुधीर अहिवळे , प्राचार्य वसंतराव शेडगे , उपमुख्याध्यापक ए वाय ननावरे, पर्यवेक्षक आर बी निंबाळकर , आर एस नाळे, सौ पूजा पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या नंतर “प्रभातफेरी “ पुन्हा प्रशालेत पोहोचलो यावेळी श्रीमंत मुधोजीराजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लेझीम नृत्य सादर केले गेले. तदनंतर प्रशालेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली

यावेळी विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पराक्रमावर आधारित भाषणे व पोवाडे सादर केले, तसेच प्रशालेचे प्राचार्य यांनी आपल्या भाषणात शिवरायांच्या जीवनातील मूल्ये – शिस्त, पराक्रम, न्यायप्रियता , व्यवस्थापन कौशल्य आणि रयत-प्रेमी दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत असे मार्गदर्शन केले व सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा! दिल्या

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तृप्ती शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सुधाकर वाकुडकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सकाळी विभाग , दुपारी विभाग व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना अल्पोपहार वाटप करण्यात आला. एकूणच, या उपक्रमामधून विद्यार्थ्यांमध्ये शिवभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यात आली

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!