उन्हाळी क्रीडा शिबिरातून दर्जेदार खेळाडू तयार होतील : श्रीमंत संजीवराजे

शिबिरातील खेळाडूंना मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,यावेळी उपस्थित महादेवराव माने, संजय फडतरे, प्रा. श्री पी एच कदम, श्री वसंतराव शेडगे , आर बी निंबाळकर , राज जाधव इत्यादी मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि.२३ एप्रिल २०२६) : –फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती, फलटण व फलटण जिमखाना फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर सोमवार दि. २३ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान विविध क्रीडांगणावरती आयोजित करण्यात आले आहेत यामध्ये खो – खो , हॉकी , कब्बडी मा. आमदार श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल, फलटण येथे तर फुटबॉल , आर्चरी, कराटे चे आयोजन श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई ) जाधववाडी, फलटण , मुधोजी महाविद्यालय फलटण येथ ॲथलेटिक्स चे क्रीडा शिबीर राबविले जाणार आहे.


फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित विविध शाळा, माध्यमिक विद्यालये, महविद्यालयातील सुमारे ४५० विविध वयोगटातील विद्यार्थी – विद्यार्थिनी या शिबीरात सहभागी झाले आहेत. शिबीराचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते नारळ वाढऊन करण्यात आले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की फलटणला खो – खो, हॉकी, फुटबॉल या खेळाची फार मोठी परंपरा आहे. ही परंपरा अखंडित सुरु ठेवण्यासाठी सर्व क्रीडा शिक्षक व खेळाडूंनी चांगला सराव व खेळामध्ये सातत्य ठेवले तर उत्तम खेळाडू तयार होतील तसेच या उन्हाळी क्रीडा शिबिरातून दर्जेदार खेळाडू तयार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच खो – खो,कब्बडी , व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, हॉकी, फुटबॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन नेहमी करण्यात येते त्यामुळे फलटण तालुक्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करुन उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीरात सहभागी खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे सदस्य तथा श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री महादेवराव माने, क्रीडा समितीचे ज्येष्ठ सदस्य, श्री. संजय फडतरे, मुधोजी महाविद्यालयाचे प्रा पी एच कदम, मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. वसंतराव कृष्णा शेडगे,उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सागर निंबाळकर , पर्यवेक्षक आर बी निंबाळकर, श्री महेश निंबाळकर यांच्यासह विविध खेळाचे क्रीडा मार्गदर्शक व खेळाडू व पालक उपस्थित होते.

यावेळी शिबीरार्थी खेळाडूंना योगाभ्यास , व्यायाम, विविध खेळ व समतोल आहारामुळे शरीरावरील मानसिक ताण कमी होण्यास आरोग्य व स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते व वजन नियंत्रणात राहते हे शारीरिक फायदे मिळतात यावरती तज्ञ मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन करण्यात आले .

या शिबीरामध्ये हॉकी, फुटबॉल, खो – खो, ॲथलेटिक्स, धनुर्विद्या, कब्बडी, कराटे या खेळांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार असून. या शिबिरासाठी क्रीडा मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून एन आय एस प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अभ्यास केला जाणार आहे

हॉकी या खेळसाठी मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून श्री. सचिन धुमाळ, श्री खुरंगे बी.बी., कु. धनश्री , फुटबॉलसाठी श्री संजय फडतरे, श्री अमित काळे, श्री अमोल नाळे, श्री उत्तमराव घोरपडे, चि संकेत मठपती, , खो – खो साठी श्री जनार्दन पवार ,श्री शिवाजी बनकर , श्री .अविनाश गंगतीरे,सौ गावडे मॅडम, मुलाणी मॅडम तर आर्चरी व कराटेसाठी श्री सुरज ढेंबरे , कब्बडीसाठी श्री तुषार मोहिते आणि ॲथलेटिक्ससाठी श्री राज जाधव, प्रा. तायाप्पा शेंडगे, शिबीरार्थी खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत.


सदर शिबीरामध्ये खेळाडूंची शारीरिक क्षमता, खेळाडूंचा आहार या संबंधीत खेळाचे कौशल्य याविषयी तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शिबिरातील सहभागी खेळाडू यांना दररोज सकाळी सरावानंतर अल्पोपहार दिला जाणार आहे. व शिबिर पूर्ण केल्यानंतर सर्व सहभागी खेळाडू यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तायप्पा शेंडगे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रस्ताविक सचिन धुमाळ यांनी केले व आभार तुषार मोहिते यांनी मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!