फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि ०५ मे २०२६): श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान, फलटणच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर (राजेसाहेब) यांची ४८ वी पुण्यथीथी आणि श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांची १०१ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त गुरुवार, दि. १४ मे ते सोमवार, दि. २५ मे २०२६ या कालावधीत ‘स्मृती महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले असून, मुधोजी हायस्कूलच्या रंगमंचावर दररोज सायंकाळी ६:३० वाजता विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.
पुरस्कार वितरण व महोत्सवाचे उद्घाटन
महोत्सवाचा प्रारंभ गुरुवार, दि. १४ मे रोजी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (माजी सभापती, विधानपरिषद) यांच्या शुभहस्ते आणि अध्यक्षतेखाली होईल. यावेळी प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक मा. डॉ. प्रमोद चौधरी यांना ‘श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.

वैविध्यपूर्ण सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम
या १२ दिवसीय महोत्सवात अनेक दिग्गज कलाकार आणि वक्ते आपली कला व विचार सादर करणार आहेत:
१५ मे: सौ. सविल सुभाष संकपाळ यांचा ‘शिवपत्नी महाराणी सईबाई’ हा एकपात्री प्रयोग.
१६ मे: विरेंद्र केंजळे (झी सारेगम विजेते) यांचा ‘साज’ हा गीतांचा कार्यक्रम.
१७ मे: प्रसिद्ध साहित्यिक प्रा. संदीप जगताप यांचे ‘कवितेतून समाज प्रबोधन’ या विषयावर व्याख्यान; अध्यक्षस्थानी माजी आमदार दीपकराव चव्हाण असतील.
१८ मे: सौ. उज्वल गोडबोले आणि सहकलाकार सादर करणार असलेला ‘माणिक रंग’ हा सांगितिक आविष्कार.
१९ मे: प्रसिद्ध कवी डॉ. इंद्रजीत भालेराव यांचे ‘शोध शेती संस्कृतीचा’ यावर व्याख्यान; अध्यक्षस्थानी डॉ. बाळासाहेब शेंडे असतील.
२० मे: मा. इंद्रजीत देशमुख यांचे ‘माणूस म्हणून जगण्यासाठी’ या विषयावर व्याख्यान; अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम असतील.
२१ मे: जयवंत आवटे यांचा ‘कथाकथन आणि बरंच काही’ हा कार्यक्रम.
२२ मे: डॉ. लक्ष्मण आसबे यांचे ‘उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ यावर व्याख्यान; अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी असतील.
२३ व २४ मे: फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेवक आणि विविध शाखांमधील विद्यार्थी कलावंतांचा ‘कलाविष्कार’ रंगणार आहे.
समारोप समारंभ सोमवार, दि. २५ मे रोजी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी माजी आमदार दीपकराव चव्हाण आणि फलटण पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
स्मृती प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी स्मृती प्रतिष्ठानचे खालील पदाधिकारी व सदस्य कार्यरत आहेत:
अध्यक्ष: श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर
उपाध्यक्ष: श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
सचिव: प्राचार्य विश्वासराव देशमुख
सदस्य: शिवाजीराव बाबुराव घोरपडे, स्नेहलता श्रीकांत फडतरे, मिलिंद राजाराम नेवसे, डॉ. निलिमा हेमंत दाते, प्रा. डॉ. अशोक नामदेव शिंदे, अरविंद सखाराम निकम, सुभाष सखाराम धुमाळ, प्रा. डॉ. संजय गणपत दीक्षित, निलम ज्ञानेश्वर देशमुख, अर्जुन कोंडीबा रूपनवर आणि राजीव सुरेशराव नाईक निंबाळकर.
या सर्व कार्यक्रमांना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


