उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांचे वैद्यकीय मदत कक्ष’चे प्रमुख मंगेश चिवटे यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची ‘सरोज विल्हा’ या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट

फलटण तिडे वृत्तसेवा (फलटण दि १४ जून २०२६):-:

शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे साहेब यांचे वैद्यकीय मदत कक्ष’चे प्रमुख श्री.मंगेश चिवटे साहेब यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांची सरोज व्हीला, लक्ष्मीनगर, फलटण येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, भेटीदरम्यान सातारा जिल्हा व फलटण तालुक्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कसा मोठ्या प्रमाणात सक्रिय करता येईल याविषयी चर्चा केली, त्यामध्ये बालकांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया तसेच जयपूर फूट संबंधी शिबिरे याविषयी चर्चा करण्यात आली, तसेच डायलिसिस मशीन वाढवण्यासंदर्भात आता फलटण आरोग्य मंडळ संचालित लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये आठ मशीन्स आहेत, त्यांची संख्या वाढवणे या संदर्भात चर्चा करण्यात आली, त्यांचे सोबत हवेली पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती श्री.युवराज काकडे हेही उपस्थित होते, श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांनी श्री.मंगेश चिवटे साहेब, श्री.युवराज काकडे साहेब यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी डॉ.पार्श्वनाथ राजवैद्य हेही उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!