मुधोजी हायस्कूलमध्ये रंगला नवागतांचा स्वागत सोहळा

नवगतांचे स्वागत करताना प्राचार्य वसंत शेडगे व इतर मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १५ जून २०२६):- उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. नवीन शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना या शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी गुलाबपुष्प आणि पाठ्यपुस्तके देत मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला

शाळेच्या आवारात काढलेल्या रांगोळ्या, सजविलेले वर्ग याने मुलांचे स्वागत करण्यात आले. नवागतांचा हा स्वागत सोहळा मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये रंगला होता.

गुलाबपुष्प व नवीन पाठ्यपुस्तकाने मुलांचे चेहरे खुलले :

मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज च्या नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप प्रशालेचे मा प्राचार्य वसंत शेडगे , ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने , पर्यवेक्षक आर बी निंबाळकर व मान्यवर पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वसंतराव शेडगे यांनी प्रशालेच्या विषयी माहिती दिली व नवीन शैक्षणिक २०२६/२७ वर्षाच्या शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने,पर्यवेक्षक श्री रावसाहेब बी निंबाळकर, पालक प्रतिनिधी व पालक वर्ग , शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल सपाटे , सचिन धुमाळ , बापूसाहेब सूर्यवंशी ,रोहन निकम , चेतन बोबडे , आदित्य केदार , डी आर जाधव , राजेंद्र गोडसे , सचिन भंडलकर , मुकबूल बदनाळे, अमोल नाळे, सौ दिपमाला घाडगे , सौ लतिका अनपट,सौ निलांबरी मगर , सौ सोहनी सस्ते,सौ अनुराधा नाईक निंबाळकर, कु संगीत कदम , सौ हेमा जाधव , सौ वैशाली रसाळ , सौ शुभदा आगवणे, सौ स्नेहल घोलप, सौ वैशाली थोरात, सौ रिटे, सौ इंगळे , रमेश रिटे, लखन करगे, उमेश मदने,विक्रम ननावारे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु तृप्ती शिंदे व संजय गोफणे यांनी केले. तर आभार अनिल यादव यांनी मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!