उद्या फलटण शहरामधील काही भागात देखभाल दुरुस्तीसाठी पाच तास वीजपुरवठा बंद

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ६ जुलै २०२६):-

महावितरणकडून एच.टी. लाईनवरील देखभाल (मेंटेनन्स) व झाडांच्या फांद्या छाटणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ३:३० या वेळेत फलटण शहर व पंचक्रोशीतील काही भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

वीजपुरवठा बंद राहणारे परिसर :
विद्यानगर, संजीवराजे नगर, बिरदेव नगर, हाडको कॉलनी, भडकमकर नगर, पद्मावती नगर, दत्तनगर, बारस्कर गल्ली, शुक्रवार पेठ, शनी नगर तसेच मलठण संपूर्ण परिसर.

नागरिकांनी याची नोंद घेऊन आवश्यक नियोजन करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!