फलटण च्या डॉ. मोहन नारायण पवार यांचा ‘मदर तेरेसा फाउंडेशन २०२६ च्या ‘क्राउन ऑफ हेल्थकेअर एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित

फिजिओथेरपी व पुनर्वसन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; ‘मदर तेरेसा फाउंडेशन’कडून सन्मान

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ११ ऑगस्ट २०२६):- फिजिओथेरपी आणि पुनर्वसन क्षेत्रात समर्पितपणे कार्य करत रुग्णांचे आरोग्य, गतिशीलता आणि जीवनमान सुधारण्यासाठी योगदान देणारे अनिरुद्ध फिजिओथेरपी सेंटर, फलटणच्या डॉ. मोहन नारायण पवार (पी.टी.) यांना ‘क्राउन ऑफ हेल्थकेअर एक्सलन्स अवॉर्ड-२०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मदर तेरेसा फाउंडेशन, पोरुमामिल्ला, वायएसआर जिल्हा, आंध्र प्रदेश यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, संस्थेच्या वतीने आरोग्यसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो.

फलटण तालुक्यातील आसू येथील डॉ. मोहन पवार यांनी फिजिओथेरपी व पुनर्वसन क्षेत्रात दिलेली समर्पित सेवा, व्यावसायिक उत्कृष्टता तसेच रुग्णांच्या आरोग्य, हालचालक्षमता आणि जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी केलेल्या कार्याची पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली. त्यांच्या तीन वर्षांच्या समर्पित व्यावसायिक सेवेसह समाजासाठी दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख प्रमाणपत्रात करण्यात आला आहे.

या सन्मानामुळे फलटणच्या आरोग्यसेवा क्षेत्रातील कार्याची राज्याबाहेरही दखल घेतली गेल्याचे मानले जात आहे.

डॉ. मोहन पवार यांच्या या यशाबद्दल प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ श्री प्रसाद जोशी , जोशी हॉस्पिटलचे चे सहकारी ,विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!