फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १९ ऑगस्ट २०२६):- दि १६ ऑगस्ट रोजी फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. घनशाम बल्लाळ यांना गुप्त बातमी मिळाली की, दोन इसम विना नंबरच्या मोटारसासयकल वर पिस्टल विक्री करणेचे उददेशाने फलटण शहरात विना नंबरचे युनिकॉर्न मोटार सायकल वर आले आहेत. अशी बातमी मिळालेने तात्काळ पोलीस निरिक्षक बल्लाळ यांनी फलटण शहर पोलीस ठाणेचे सपोनि जगदाळें, सपोनि शिंदे यांचेसह डी.बी. पथकास योग्य त्या सुचना देऊन संशईत आरोपींना ताब्यात घेणेचे सुचना दिल्या. त्याप्रमाणे फलटण शहर पोलीस ठाणेचे पथकाने सापळा रचुन स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा फलटण जवळ एका विना नंबरचे युनिकॉर्न मो/सायकलवरुन आलेले दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता मोटार सायकल वर पाठीमागे बसलेला इसमाचे कमरेला खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्टल व पिस्टलच्या मॅगझीनमध्ये एक जिवंत काडतुस मिळुन आलेने पोलीसांनी सदर पिस्टल जप्त करुन आरोपीविरुध्द फलटण शहर पोलीस ठाणेत गुन्हा रजि.नं.३०३/२०२६ शस्त्र अधिनियम कलम ३,२५ सह म.पो.का. कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी कडुन खालील मुददेमाल जप्त केला आहे.
१)५०,०००/- रु. किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल
२) २००/- रु. किमतीचे एक जिवंत काडतुस
३) १,१५,००० रु. किमतीची काळया रंगाची विना नंबरची युनिकॉर्न मोटार सायकल

अटक आरोपी- १) जय दयानंद मागाडे वय २० वर्षे रा. आंबेडकरनगर, साखरवाडी ता. फलटण जि.सातारा २) प्रदिप संतोष गोरे वय २२ वर्षे रा. खामगाव रोड, साखरवाडी ता. फलटण जि.सातारा यांना अटक केली आहे.
सदरची कारवाई मा. श्री निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधिक्षक सो सातारा, श्री धन्यकुमार गोडसे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो फलटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी श्री घनशाम बल्लाळ, सपोनि मिठु जगदाळे, सपोनि एस.व्ही.शिंदे डी.बी. पथकाचे पोहवा संतोष नाळे, मुकेश घोरपडे, जितेंद्र टिके, अतुल बडे यांनी पुर्ण केली असुन गुन्हयाचा पुढील तपास सपानि शिंदे करीत आहेत.

