सातारा जिल्ह्यात खरिप पणन हंगाम २०२६-२७ साठी शेतकरी नोंदणी सुरूसात खरेदी केंद्रांना मान्यता

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा, दि. १ सप्टेंबर २०२६):- किमान आधारभूत किंमत खरेदी योजना खरिप पणन हंगाम २०२६-२७ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून धान व भरडधान्य (मका/ज्वारी/बाजरी) खरेदी करण्यासाठीची पूर्वतयारी बैठक मा. जिल्हाधिकारी महोदय, सातारा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार सातारा जिल्ह्यात १ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
भरडधान्य (मका) खरेदीः ०२ केंद्रांवर ४४८ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून, ३४४ शेतकऱ्यांकडून ९४२७.५० क्विंटल मका खरेदी करण्यात आली व शेतकऱ्यांना २,२६,२६,०००/- रुपये अदा करण्यात आले. नाफेड सोयाबीन खरेदीः ०९ केंद्रांवर ८४२ शेतकरी नोंदणी अंतर्गत, ८१६ शेतकऱ्यांकडून ९७११.०० क्विंटल सोयाबीन खरेदी करून ५,१७,४०, २०८/- रुपये अदा करण्यात आले. नाफेड चना खरेदीः ०९ केंद्रांवर ९० शेतकरी नोंदणी अंतर्गत, ८० शेतकऱ्यांकडून ८७९.०० क्विंटल चना खरेदी करून ५१,६४,१२५/- रुपये अदा करण्यात आले.
मागील हंगामात सुरळीत व विना-तक्रार कार्यरत असलेली २ केंद्रे (फलटण व माण (दहिवडी)) या हंगामातही कायम ठेवण्यात आली असून, शेतकरी वर्गाच्या सोयीसाठी नवीन ५ केंद्रे जोडण्यात आली आहेत. त्यानुसार एकूण ७ केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडेल.
पूर्वीची कार्यरत २ केंद्रेः फलटण व माण (दहिवडी) नवीन मंजूर ५ केंद्रे सातारा, वाई, मसूर, कोरेगाव व कवठे. शेतक-यांनी मुदतीत आपल्या नजीकच्या अधिकृत केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!