‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानांतर्गत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विशेष स्वच्छता उपक्रम उत्साहात संपन्न…

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ७ ऑक्टोबर २०२६): –
‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमांतर्गत फलटण पंचायत समितीच्या निर्देशानुसार फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या विशेष अभियानांतर्गत प्रशालेच्या विस्तृत परिसरात जमा झालेला प्लास्टिक कचरा संकलित करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. दैनंदिन परिपाठामध्ये विद्यार्थ्यांना प्लास्टिक वापराचे गंभीर दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले तसेच स्वच्छतेच्या सहा महत्त्वाच्या संदेशांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. शाळा परिसर प्लास्टिकमुक्त ठेवण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्गखोलीत व प्रांगणात स्वतंत्र डस्टबिन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय स्वच्छतेचे सहा मुख्य संदेश शाळेच्या किचनशेड परिसरात व दर्शनी भागात स्पष्ट फलकांवर नमूद करण्यात आले.


उपक्रमादरम्यान प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेची शपथ आणि जलप्रतिज्ञा घेण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बालवयापासूनच स्वच्छता, जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची सवय व आवड निर्माण करणे हाच प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे, असे मत प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी व्यक्त केले.


या स्वच्छता मोहिमेत मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंतराव शेडगे यांच्यासह ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने ,पर्यवेक्षक विजय पाटील, सौ. पूजा पाटील, सौ. लक्ष्मी बुचडे, कु शीतल जाधव,शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!