फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर तेजीत; कमाल भाव ५१०० रुपयांवर

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण ,दि २ सप्टेंबर २०२६): –
कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटण येथील मुख्य बाजार आवारात मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या लिलावात कांद्याचे दर तेजीत राहिल्याचे पाहायला मिळाले. बाजारात कांद्याची एकूण १३७५ क्विंटल (२७५० पिशवी) आवक झाली होती.
आजच्या लिलावात कांद्याला प्रतिक्विंटल किमान १६०० रुपये तर कमाल ५१०० रुपये इतका दर मिळाला. तसेच कांद्याचा सरासरी बाजारभाव ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. मार्केट यार्डात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!