मुधोजी हायस्कूलमध्ये ‘आरोग्य आणि आहार’ विषयावर व्याख्यान संपन्न; विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे धडे

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १७ सप्टेंबर २०२६): –
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘आरोग्य आणि आहार’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. के. शेडगे होते, तर उपप्राचार्य एस. एस. माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

Screenshot


या प्रसंगी प्रमुख वक्त्या डॉ. नीलिमा दाते व सौ. नायर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले. निरोगी शरीर आणि मनासाठी संतुलित व पौष्टिक आहार, नियमित व्यायाम, वैयक्तिक स्वच्छता आणि दैनंदिन आहारातील योग्य सवयींचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती होण्यास मदत झाली. कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. व्ही. आर. लोणकर यांनी केले, तर आभार सौ. एन. ए. कुमठेकर यांनी मानले.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!