फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि २४ सप्टेंबर २०२६):-
सेवा संकल्प अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटणच्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रेणुका राठोड यांनी ट्रॅक्टर शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहनचालकांना मार्गदर्शन केले.

ऊस वाहतूक करताना उसाने भरलेल्या ट्रॉलीच्या मागील बाजूस कापडी परावर्तक (रिफ्लेक्टर) लावण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः रात्रीच्या वेळी मागून येणाऱ्या वाहनचालकांना ट्रॉली सहज दिसण्यासाठी परावर्तकांचा वापर महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मोटार वाहन निरीक्षक भारती इंगळे उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित नागरिक व वाहनचालकांना वाहनचालक परवाना, त्यासाठी आवश्यक प्रक्रिया तसेच वाहन चालविताना परवाना बाळगण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.


