फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ६ ऑक्टोबर २०२६):-
सभासदांच्या हितासाठी व जलतरणपटू यांच्या भविष्यासाठी विविध उपक्रम राबवू व स्वमालकीची जागा खरेदी करणार असल्याचे प्रतिपादन वीर सावरकर स्वीमर्स क्लबचे अध्यक्ष डॉ अशोक तांबे यांनी सांगितले.
वीर सावरकर स्वीमर्स क्लब यांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार ४ ऑक्टोंबर रोजी संपन्न झाली .

या प्रसंगी सल्लागार सदाशिव सातव ,राजेंद्र जाधव, महेंद्र ओसवाल, सचिव विश्वास शेळके,खजिनदार मिलिंद अत्रे, संचालक दीपक बनकर,अमोल गावडे, बाळासाहेब टाटिया, ऍड पंढरीनाथ नाळे ,अनिल सातव,शर्मिष्ठा जाधव व सभासद उपस्तीत होते.
नवीन स्विमिंग टॅंक लवकरच सभासदांसाठी तयार होत असून, अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त असा हा टॅंक असून , महिलांसाठी जुना टॅंक देण्यात येणार आहे व आजीव सभासद यांना वार्षिक फी २ हजार करण्यात येणार असल्याचे डॉ अशोक तांबे यांनी सांगितले.

विविध जलतरण स्पर्धेमध्ये यश मिळवलेले सभासद,खेळाडू यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
अहवाल वाचन सचिव विश्वास शेळके यांनी केले.
सचिन भूतकर, दिलीप शिंदे, पांडुरंग कचरे, किरण शिंदे, नगरसेवक राहुल वाघोलीकर,राजाभाऊ भोईटे,डॉ वाघमोडे, पत्रकार धनु सस्ते आदींनी विविध प्रश्न मांडले.
सूत्रसंचालन सावळेपाटील व आभार व्यवस्थापक सुनील खाडे यांनी मानले

