फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ११ ऑक्टोबर २०२६): –
खंडोबानगर (बारामती) येथील रहिवासी श्रीमती कलावती यादवराव बोराटे (वय ८५) यांचे रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन सुना, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बारामतीतील प्रसिद्ध व्यावसायिक ‘प्रकाश इलेक्ट्रिक’चे संचालक प्रकाश यादवराव बोराटे आणि राम यादवराव बोराटे यांच्या त्या मातृश्री होत. त्यांच्या निधनाने बोराटे परिवारावर शोककळा पसरली असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून बोराटे परिवाराचे सांत्वन करण्यात येत आहे.
बारामती येथील श्रीमती कलावती यादवराव बोराटे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
