स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीतील ‘सर्वोत्तम पुरस्कारा’ने अमित जगताप यांचा साऊथ कोरियात गौरव; सीईओ क्लब मेंबर म्हणून उत्कृष्ट कामगिरीची दखल

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २३ नोव्हेंबर २०२६): –
भारताची अग्रगण्य हेल्थ इन्शुरन्स कंपनी असलेल्या स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या वतीने नुकत्याच साऊथ कोरिया येथे आयोजित करण्यात आलेल्या आठ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये सीईओ क्लब मेंबर अमित जगताप यांना प्रतिष्ठेचा ‘सर्वोत्तम पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे.विमा क्षेत्रातील त्यांची उल्लेखनीय कामगिरी, ४९.२३ लाख रुपयांचा फ्रेश जीडब्ल्यूपी (Fresh GWP) आणि एकूण ९५.६७ लाख रुपयांचा जीडब्ल्यूपी (Total GWP) व्यवसायाचा टप्पा गाठल्याबद्दल त्यांना हा बहुमान मिळाला आहे.


साऊथ कोरिया येथे पार पडलेल्या या भव्य कॉन्फरन्समध्ये स्टार हेल्थ कंपनीचे सीईओ आनंद रॉय, एमडी हिमांशू वालिया, महाराष्ट्र व राजस्थान हेड विजय अरोरा आणि सातारा रिजन हेड संजय कनोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते अमित जगताप यांना हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला.

या अभिमानास्पद यशाबद्दल अमित जगताप यांनी सर्व स्टार हेल्थ पॉलिसीधारक तसेच सिनियर सेल्स मॅनेजर गणेश गायकवाड, बारामती ब्रांच मॅनेजर योगेश पुरोहित आणि सातारा झोनल मॅनेजर श्रीकांत पिसाळ यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या सन्मानाबद्दल अमित जगताप यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!