राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फलटण शहराध्यक्षपदी प्रमोद ( अण्णा ) निंबाळकर तर फलटण तालुकाध्यक्षपदी जयकुमार इंगळे

फलटण टुडे (सातारा दि. ९ ) : – 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने नुकत्याच फलटण तालुक्याच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
शहराध्यक्षपदी प्रमोद अण्णा निंबाळकर व तालुकाध्यक्षपदी जयकुमार इंगळे यांची एकमताने निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र विधान परिषदेत विद्यमान सदस्य आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, यांच्या शुभहस्ते व सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथे देण्यात आले.
     यावेळी प्रमुख उपस्थिती माणचे युवा नेते मनोज दादा पोळ, दत्तात्रय अनपट, महादेव माने तुषार नाईक निंबाळकर राहुल निंबाळकर,अमोल भोईटे, बापूराव शिंदे , दादासाहेब चोरमले, अनिल शिरतोडे, फिरोज बागवान, तेजसिंह इंगळे,राजेंद्र कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!