फलटण टुडे (आसू आनंद पवार. ):
कळंब तालुका इंदापूर येथील फडतरे नॉलेज सिटी चे वेंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूल कळंब ची विद्यार्थिनी अंकिता जालिंदर फडतरे हिची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड.
इंदापूर जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये ४२ किलो वजनी गटांमध्ये आसू तालुका फलटण गावची कन्या अंकिता जालिंदर फडतरे इयत्ता आठवी हिने प्रथम क्रमांक मिळवला तिची पुणे येथे होणाऱ्या दिनांक ११ रोजी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिच्या यशाबद्दल तिचे उद्योजक श्रीमंत बंटीराजे खर्डेकर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर श्रीमंत दिव्यांजलीराजे खर्डेकर , फडतरे नॉलेज सिटी चे सर्वेसर्वा उत्तमदादा फडतरे महाराष्ट्र केसरी पैलवान धनाजी फडतरे महाराष्ट्रा चॅम्पियन पैलवान अमोल फडतरे ,प्राचार्य रॉबर्ट सर ,क्रीडा शिक्षक तानाजी शिंदे यांनी अभिनंदन केले