जी. डी. सी. अँड ए. व सी. एच. एम. परीक्षेचे प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन

 

सातारा दि. 8 ( फलटण टुडे ) :
 माहे ऑक्टोंबर 2021 मध्ये झालेल्या जी. डी. सी. अँड ए. व सी. एच. एम. परीक्षा 2020 चा निकाल यापूर्वीच प्रसिद्ध केलेला आहे. या परिक्षेला बसलेल्या सर्व परिक्षार्थ्यांची गुणपत्रके व प्रमाणपत्रे परिक्षार्थ्यांना वितरित करण्यासाठी संबंधित केंद्राचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे देण्यात आलेले आहेत.

            परिक्षार्थींनी एका महिन्याचे कालावधीत त्यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र संबंधित केंद्रावरून स्वत: घेऊन जावे. इतर तपशिलासाठी https://sahakarayukta.maharashtra.gov.in मधील “महत्वाचे दुवे मधील जी.डी.सी.ॲण्ड ए. मंडळ” या संकेतस्थळाचे अवलोकन करावे असे, जी.डी.सी.ॲण्ड ए. बोर्ड तथा उपनिबंधक (परीक्षा व प्रशिक्षण), सहकारी संस्था, पुणेचे सचिव  महेंद्र मगर यांनी कळविले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!