बारामती :
बारामती विद्या प्रतिष्टान कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी अमोल श्रीकृष्ण साळुंके याची दक्षिण कोरिया येथे पीएच. डी. साठी निवड झाली आहे.
अमोल साळुंके याने बी. स्सी रसायनशास्त्र ही पदवी कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती व एम.एस्सी. नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्रिची येथून संपादन केली. त्याची नुकतीच डोन्गगूक युनिव्हर्सिटी,सेऊल ,दक्षिण कोरिया येथे पीएच. डी. साठी निवड झाली आहे.
डॉ . रमेश देवकते यांचे दक्षिण कोरिया मधील सहकारी डॉ . अकबर इनामदार व ह्यूनसिक इम यांच्या मार्गदर्शनाखाली तो पीएच. डी.चे संशोधन पूर्ण करेल.
मागील एक वर्षापासून तो डॉ . रमेश देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात संशोधन करीत होता.
या महाविद्यालयातून पीएच. डी. साठी दक्षिण कोरिया येथे जाणारा तो पहिलाच विद्यार्थी आहे.
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात सध्या जैवतंत्रज्ञान, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या तीन विषयात विद्यार्थ्यांना पीएचडी करण्याची सोय आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. पी. व्ही. पाटील यांनी साळुंखे यांचे हार्दिक अभिनंदन केले.