फलटण दि. १० :
विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून ठाकुरकी फरांदवाडी गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी ;
याबाबत सविस्तर माहिती अशी की ठाकुरकी व फरांदवडी गावांमधील वाढती लोकसंख्या व शहरीकरणामुळे लोकवस्तीत होणारी वाढ ,त्यासाठी करावयाचे पाण्याचे नियोजन यासाठी गावचे माजी उपसभापती विवेक शिंदे यांनी विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपकराव चव्हाण यांच्याकडे सतत पाठपुरावा करून गावातील पाण्याची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी आग्रह धरून मोठ्या प्रमाणात मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी श्रीमंत रामराजे साहेब यांच्याकडून जल जीवन मिशन अंतर्गत ठाकुरकी व फरांदवाडी संयुक्त नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली असून सदर योजनेसाठी शासनाच्या वतीने 19 कोटी 57 लाख 76 हजार रुपये इतक्या रकमेची कामाची मंजुरी मिळालेली आहे ही बातमी आमदार दिपक राव चव्हाण यांनी गावातील ग्रामस्थांना प्रत्यक्षात मंजुरी पत्र सोशल मीडियावर दिली. ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत असून लवकरच विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आमदार दिपक राव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर सभापती श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजनाचा भव्य समारंभ घेण्यात येणार असल्याची माहिती माजी उपसभापती विवेक शिंदे यांनी दिली.