सातारा, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 713.41 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 52.75 मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 54.67 (409.09) मि. मी., जावळी- 96.75 (743.08) मि.मी. पाटण-79.55 (677.27) मि.मी., कराड-33.00(330.15) मि.मी., कोरेगाव-34.00 (294.61) मि.मी., खटाव-15.29(270.35) मि.मी., माण- 8.86 (254.57) मि.मी., फलटण- 6.67 (249.07) मि.मी., खंडाळा- 42.30 (269.70) मि.मी., वाई – 51.71 (417.96) मि.मी., महाबळेश्वर-290.63 (2496.98) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 6412.82 मि.मी. तर सरासरी. 582.98 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी
कोयना धरणात 55.15 उपयुक्त पाणीसाठा
सातारा दि. 5 (जि. मा. का) : कोयना धरणात आज 55.15 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 55.8 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 247 नवजा येथे 300 व महाबळेश्वर येथे 304मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम- 5.51 (47.13), धोम-बलकवडी- 2.46 (62.25), कण्हेर- 5.06 (52.73), उरमोडी- 6.74 (69.83), तारळी- 3.05 (52.20), निरा-देवघर 3.06 (26.13), भाटघर- 9.86(41.95), वीर – 3.72. (68.39).