अखेर सोमेश्वर ची श्रावणी यात्रा रद्द इतिहास मध्ये पहिल्यांदा यात्रा रद्द

बारामती: ऐतहसिक व पौराणिक महत्व असलेल्या सोमेश्वर च्या महादेवाची श्रावणी यात्रा रद्द करण्यात आली आहे.
देशात उद्भवलेल्या कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील करंजे येथील ऐतिहासिक सोमेश्वर मंदीराची यात्रा यंदाच्या वर्षी प्रथमच रद्द करणेचा निर्णय विश्वस्त समितीने घेतला आहे.
विश्वस्त समिती अध्यक्ष विनोद भांडवलकर ,विश्वस्त ॲड गणेश आळंदीकर व सचीव सुनिल भांडवलकर यानी याबाबत माहीती दिली . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याच्या आधारे जिल्ह्यात लागु केलेल्या कायद्यानुसार कोरोना पासून बचावासाठी सोशल डिस्टन्सींग रहावे, संचार बंदीचे काटेकोर पालन व्हावे या हेतुने उपाययोजना म्हणुन देवस्थान समितीने तातडीची बैठक घेतली. यावेळी अध्यक्ष विनोद भांडवलकर , विश्वस्त ॲड .गणेश आळंदीकर , सचिव सुनिल भांडवलकर, विश्वस्त सोमनाथ भांडवलकर , प्रताप भांडवलकर , प्रविण भांडवलकर , शशीकांत मोकाशी आदी विश्वस्त हजर होते. या बैठकीत गर्दी टाळण्याच्या हेतूने काही विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान यात्रेनिमित्त यंदा कोणतीही दुकाने चालू राहणार नाहीत. मंदीर प्रवेश देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद राहणार आहे. मात्र परंपरेप्रमाणे विधीवत पुजा अर्चा, सोमवतीचे पालखीचे स्नान, सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन, मास्क वापरुन, सॅनिटायझर व्यवस्थेसह केले जाणार आहे. यावर्षी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी सोमवतीची पालखी यंदा निरा स्नानावेळी वाहनातून नेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!