फलटण :- आरटीओची नोकरी लावतो असे सांगून वेळोवेळी १ कोटी २५ लाख रुपये घेवुन महिलेची व तिच्या वडीलांची फसवणूक केल्याबाबत एक जणांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आरटीओची नोकरी लावतो असे सांगून वेळोवेळी नोकरीचे आमिष दाखवून विश्वास संपादन करून वेळोवेळी २८ जानेवारी २००९ ते आज १६ जुलै २०२० दरम्यान १ कोटी २५ लाख रुपये रोख स्वरूपात घेऊन तसेच नोकरी लागल्याचे खोटी पत्रे पाठवून ती खरी असल्याची सांगून फिर्यादी महिला योगिता शिवाजी गुंजवटे, वय ३५, रा झिरपवाडी ता फलटण व तिच्या वडीलांची फसवणूक केल्याबाबत आरोपी प्रमोद हरीचंद्र रणवरे, रा मलटण ता फलटण याच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ हे करीत आहेत.