
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १७ एप्रिल २०२६):-फलटण शहरातील तसेच शहरालगतच्या पंचक्रोशीतील नागरीकांना याव्दारे सुचित करणेत येते की, रविवार दिनांक १९/०४/२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होत असलेने शहरामध्ये मोठी मिरवणूक निघत असते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आबेंडकर चौक ते महात्मा फुले चौक ते मालोजीराजे पुतळा या परिसरात मोठ्या संख्येने नागरीकांची गर्दी होणेची शक्यता नाकारता येत नाही या करिता सदर दिवशी होणारा आठवडी बाजार हा गिरवी नाका ते शासकिय विश्राम गृह ते बि.एस.एन. एल ऑफीस रोड कामगार वसाहत. या ठिकाणी बसविणेत येईल याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी. व नगरपरिषदेस सहकार्य करावे.

