बारामती (पुणे) : बारामती शहरातील अशोकनगरमधील एका वकिलांच्या पत्नीसह शहरातील ज्येष्ठ नगरसेवकांचा मुलगा व तांबेनगरमधील एक रहिवासी आज कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच, कोरोनाग्रस्त झालेल्या आयटी अभियंत्याचे तालुक्यातील काटेवाडी येथील दोन मित्रही आज पॉझिटीव्ह निघाले, तर सावळ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुणे शाखेत कार्यरत एक कर्मचारीही पॉझिटीव्ह निघाला. बारामती तालुक्यात एकूण पाच जण आज कोरोनाबाधित आढळले आहेत.
बारामती शहर व तालुक्यात आज कोरोना रुग्णांचा आकडा अचानक पाच ने वाढला. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. आज एकाच दिवशी सहा कोरोनाबाधित निघाल्याने बारामतीतही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इतक्या दिवस बारामतीने कोरोनाची साखळी तोडण्यात यश प्राप्त केले होते. आज अचानकच शहराच्या मध्यवर्ती भागातील लोकांना कोरोनाची लागण झाल्याने बारामतीकरांचे धाबे दणाणले आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बैठक घेतली. शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाला तातडीने कोरोना केअर सेंटर करून येथील सर्व कामकाज एमआयडीसीतील महिला रुग्णालयातून करण्याचे निर्देश पवार यांनी आरोग्य विभागास दिले आहे. जे रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आहेत, पण ज्यांना तीव्र लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात ठेवले जाणार आहे. त्या दृष्टीने आता आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत.
आज कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढल्यानंतर पुन्हा काही बाबतीत निर्बंध कडक करायचे का या वरही चर्चा झाली. प्रत्यक्षात मात्र या बाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही. लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर आणि सॅनेटायझरचा वापर करावा, अनावश्यकरित्या रस्त्यावर फिरू नये, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीतील बैठकीत केले आहे. प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून साखळी मोडण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!