फलटण :- मा प्रकाश सूर्यवंशी उपविभागीय कृषि अधिकारी फलटण,मा सुहास रणसिंग तालुका कृषि अधिकारी फलटण , मा भरत रणवरे मंडळ कृषि अधिकारी बरड, श्री मल्हारी नाळे कृषि पर्यवेक्षक बरड श्री सचिन नेवसे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक , श्री सूरज फुले सहाय्यक व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे वाटप कार्यक्रम सुरू आहे
महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत राजाळे येथील शेतकऱ्यांना बांधावर तूर बियाणे वाटप करण्यात आले
दिनांक १९/६/२०२० रोजी श्री दीपक मोरे गाव राजाळे तालुका फलटण जिल्हा सातारा यांच्या बांधावर BDN- 711 या वाणा चे तूर लागवड कार्यक्रम संपन्न झाला
कडधान्याचे गरज आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे समजले जाते
शेतकऱयांनी स्वतःची व आपल्या कुटुंबातील आरोग्यासाठी कडधान्य ची गरज भागवण्यासाठी तूर बांधावर लावल्यामुळे शक्य होणार आहे तसेच तुरीच्या हिरव्या शेंगा पासून उसळची भाजी, आमटी तयार करण्यासाठी, तसेच मसाले भात केल्यानंतर त्यात या तुरीच्या हिरव्या शेंगा वापरल्या जातात
शेतकऱयांनी बांधावर तूर लावल्या मुळे त्याच्या पासून ही आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे तसेच जमिनीचे पोत सुधारण्यासाठी मदत होणार आहे व बांधावरील माती वाहून जाणार नाही त्यामुळे बंधांचे होणारे पावसा मुळे नुकसान टाळता येणार आहे अश्या विवीध फायदेशीर बांधवर तूर शेतकऱ्यांनसाठी वरदान आहे
श्री दीपक मोरे यांच्या शेताच्या बांधावर तूर लागवड कार्यक्रम प्रसंगी श्री सचिन जाधव कृषि सहाय्यक राजाळे इतर शेतकरी उपस्थित होते
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!