डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशी बनारस
फलटण टुडे (बारामती प्रतिनिधी):-
श्री क्षेत्र काशी येथील श्री श्री श्री १००८ डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे बारामती मध्ये शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता आगमन होत आहे त्यानंतर भव्य मिरवणूक बारामती शहरात काढली जाणार आहे.
शनिवार २३ नोव्हेंबर रोजी गंगा पूजन व महास्वामीजी यांची इष्टलिंगपूजा होणार आहे त्यानिमित्ताने त्यांचा दर्शनाचा लाभ व आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी सुनील हिंगाने निवस्थास्थनी गुरुमाऊली बंगला हिंगणे वस्ती तांदुळवाडी रोड या ठिकाणी उपस्तीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.