
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २५ एप्रिल २०२६):- शासनाच्या जाचक अटींविरोधात आणि शेतकरी बांधवांच्या हितासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र धारक सोमवार दिनांक २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती फलटण तालुका कृषी डीलर असोसिएशन च्या वतीने देण्यात आली आहे.
आपल्या विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य बंदला फलटण तालुक्यातील सर्व ३०० कृषी सेवा केंद्र चालक यामध्ये सहभागी होणार असल्याचे संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष श्री रणजीत भाऊ निंबाळकर यांनी सांगितले.
यावेळी फलटण तालुका संघटनेचे तालुकाध्यक्ष रणजीत भाऊ निंबाळकर, उपाध्यक्ष किरण भैय्या जाधव, सचिव अविनाश नेवसे, राजकुमार व्होरा, नरेंद्र भैय्या तावरे, बाहुबली शहा, अनुप शेठ शहा, अदी मान्यवर सदस्य उपस्थित होते



