१४ जून रोजी अनंत मंगल कार्यालय, कोळकी येथे फलटण-माण खटाव विधानसभा मतदारसंघातील इच्छुक शिवसैनिकांना संधी; विविध पदांसाठी मुलाखती

शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी माढा लोकसभा मतदारसंघात विशेष उपक्रम; चंद्रहार पाटील यांनी दिली माहिती

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण,दि १२ जून २०२६): शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण-कोरेगाव व माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक शिवसैनिकांच्या मुलाखतींचे आयोजन रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी फलटण येथे अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे करण्यात आले आहे. या मुलाखतींद्वारे पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच तळागाळातील कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील इच्छुक शिवसैनिकांच्या मुलाखती सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत होणार असून, माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील मुलाखती दुपारी १२.३० ते २ या वेळेत पार पडणार आहेत. या मुलाखतींचे ठिकाण कोळकी (ता. फलटण) येथील अनंत मंगल कार्यालय निश्चित करण्यात आले आहे.
या मुलाखतीं शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे व माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख पै.चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा महिला आघाडी संपर्कप्रमुख सौ. रेश्माताई जगताप व माढा लोकसभा युवा सेनेचे संपर्कप्रमुख सुजित खुर्द यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शिवसेना संघटनेच्या विविध पदांसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहून मुलाखती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्षम नेतृत्व निवडण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
या संदर्भातील माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख पै.चंद्रहार पाटील यांनी दिली आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!