फलटण टुडे वृत्तसेवा ( अमोल नाळे) :-
दीड ते दोन महिन्याच्या कालावधी नंतर गुरुवारी शाळेच्या घंटा वाजल्या, शाळेचा आजचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, आनंद दिसत होता. शाळेचा पहिला दिवस काही पालक मुलाला चालत सोडायला आले होते, तर काही मोटार सायकलने, काहींनी तर चारचाकी आणली होती, काही मुलांनी रिक्षात येणे पसंत केले होते. यावेळी मुलांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता, शाळेत येताना नवा गणवेश, नवे दप्तर, नवे शूज, चप्पल सँडेल परिधान केले होते. नवा वर्ग कसा असेल, नवीन मित्र मैत्रिणींची ओळख, मैत्री होणार, वर्ग शिक्षक कोण असणार याची मोठी उत्सुकता विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर दिसत होती. दीड ते दोन महिने शाळेचा परिसर ओस पडला होता, शाळेकडील रस्ते सामसूम होते, आता शाळेला सुरुवात झाल्याने शाळेचा परिसरात पुन्हा विद्यार्थीची किलबिल ऐकू यायला लागली, तर रस्त्यावर विद्यार्थी, पालकांची गर्दी दिसू लागली तर सक्तीच्या रजेवर गेलेल्या स्कुल बस रस्त्यावर पुन्हा धावू लागल्या आहेत.
अन् शाळेची घंटा वाजली…

