योगासनाचे महत्त्व समजून योगसाधनेचा प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

आंतरराष्ट्रीय योगदिनी’ योग गुरू प्रवीण बांदकर या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अरविंद निकम, वसंतराव शेडगे , सोमनाथ माने , रावसाहेब निंबाळकर व इतर मान्यवर

मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योगदिनी’ योगादिन साजरा करून दिला निरोगी आरोग्याचा संदेश

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि. २२ जून २०२६):-
दरवर्षीप्रमाणे यंदाही २१ जून रोजी फलटणसह संपूर्ण देशासह ‘महाराष्ट्रात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. निरोगी आरोग्याचा संदेश देण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विशेष योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

फलटण एज्यूकेशन सोसायटी व योगरेखा योग इंस्टिट्यूट,फलटण आणि सुहासिनी योग यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल, फलटण येथे दरवर्षी प्रमाणे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योगाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुलच्या भव्य अशा मैदानावर दिड हजार विद्यार्थी , शंभर शिक्षक – शिक्षिका व योगरेखा योग इंस्टिट्यूट,फलटण आणि सुहासिनी योग वर्गाचे सहकारी यांनी एकाच वेळी योग प्रात्यक्षिके करुन योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.यावेळी मुधोजी हायस्कूलच्या मुलींच्या एका ग्रुपने सौ खिलारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रात्यक्षिक करून दाखविली

Screenshot

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढऊन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती फलटण एज्यूकेशन सोसायटी चे प्रशासन अधिकारी अरविंद निकम ,मुंबई येथील प्रसिद्ध योग गुरू प्रवीण बांदकर, योग शिक्षक श्रुती शिंदे , प्रसाद म्हामूणकर,गायत्री शेटे ,संयोजक योगरेखा योग इंस्टिट्यूट,फलटणच्या सौ रेखा खिलारे, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी फलटण एज्यूकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे स्वागत प्रशालेचे प्राचार्य यांनी शाल व श्रीफळ देऊन केले तसेच योग गुरूंचे व प्रशासन अधिकारी अरविंद निकम यांचे स्वागत फलटण एज्यूकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कल्पवृक्ष देऊन केले तसेच यावेळी योग शिक्षक आणि मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे पर्यवेक्षक रावसाहेब निंबाळकर यांनी केले .

यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि व्यायामाचे व योगाचे महत्त्व याची माहिती देवून मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी योग साधनेची गरज असते याचे महत्व सांगितले. आहार, विहार आणि व्यायामाचा अभाव मुळे आरोग्य बिघडते तर योगामुळे शरीर लवचिक होते, सामर्थ्य वाढते, रक्तवाहिन्यांचे आरोग्य उत्तम सुधारते आणि मानसिक ताणतणाव, नैराश्य दूर होण्यास मदत होते. योगसाधना करून ‘निरोगी भारत, आरोग्यसंपन्न भारत’ निर्माण करण्याचा संकल्प करुयात, दररोज योगसाधना, सूर्यनमस्कार, व्यायाम करून आपले आरोग्य उत्तम ठेवले तर मन प्रसन्न राहते म्हणून दररोज योगसाधना करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले. ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योग गुरू व विद्यार्थी एकत्र येऊन योगा साधना करणे व योगासनाचे महत्त्व समजून योगसाधनेचा प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे व फक्त योगदिनी या एकच दिवशी योगाभ्यास न करता तो दररोज करणे आवश्यक आहे यांची प्रेरणा प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घ्यावी असे प्रतिपादन आपल्या भाषणात त्यांनी यावेळी केले.

तसेच प्रशालेचे प्राचार्य श्री वसंत शेडगे यांनी आपल्या भाषणात योगदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यानी आपल्या दैनंदिन जीवनात योगासने आणि प्राणायामाचा समावेश करण्याचे आवाहन केले.योग दिनाचे महत्त्व आणि संकल्पनायोग हे केवळ शारीरिक व्यायामापुरते मर्यादित नसून, ते शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या प्राचीन भारतीय परंपरेमुळे शरीराची लवचिकता वाढते, तणाव कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते असे सांगितले

योग गुरु प्रवीण बांदकर व त्यांच्या सहकारी श्रुती शिंदे , प्रसाद म्हामूणकर,गायत्री शेटे यांनी योगासनांची माहिती दिली व योगप्रत्यक्षिक करून दाखविले यावेळी वीरभद्रासन, ताडासन, वज्रासन, बद्ध कोणासन,क्लॅपिग, कपालभाती, शुद्धीकरण क्रिया, भ्रामरी प्राणायाम, ओमकार,सूर्यनमस्कार यांची सामुहिक प्रात्यक्षिके घेतली यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटी व योगरेखा योग इंस्टिट्यूट,फलटण आणि सुहासिनी योग या संस्थेच्या वतीने योग दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी प्रशालेचे प्राचार्य मा. वसंत शेडगे , ज्युनियर कॉलेज चे उपप्राचार्य सोमनाथ माने , पर्यवेक्षक श्री रावसाहेब निंबाळकर, भरत खिलारे , पत्रकार मोहनराव कदम,यशराज भांबुरे व क्रिडा शिक्षक तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक तुषार मोहिते यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार क्रीडा मार्गदर्शक सचिन धुमाळ यांनी मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!