फिजिओथेरपी म्हणजे नक्की काय?

डॉ. मोहन पवार
शारीरिक चिकित्सक

फलटण टुडे वृत्तसेवा ( विशेष लेख डॉ. मोहन पवार ):

फिजिओथेरपी फक्त अलीकडच्या काळात उदयाला आलेली थेरीपी नसून ही प्राचीन काळापासून चालत आलेली एक आरोग्य सेवा आहे जो दुखापत आजार किंवा अपंगत्वामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची हालचाल आणि कार्यक्षमता पूर्ववत करण्यावर लक्ष केंद्रित करतो फिजिओथेरपी हे केवळ व्यायामापुरतेच मर्यादित नाही यात मूल्यांकन मॅन्युअल थेरेपी इलेक्ट्रोथेरेपी रुग्ण शिक्षण आणि पुनर्वसन यांचा एकत्रितपणे समावेश करून जीवनमान सुधारणे हे अंतिम ध्येय आहे फिजिओथेरपिस्ट अनेक विशेष तज्ञ क्षेत्रामध्ये काम करतात जसे की ऑर्थो मध्ये हाडांच्या सांध्यांच्या दुखापतीसाठी अस्थिरोग उपचार न्यूरोलॉजी मध्ये स्ट्रोक मेरूरज्जुची इजा आणि पार्किन्सन्ससाठी कार्डिओपुमोनरी मध्ये यूरोलॉजी शस्त्रक्रिये नंतरच्या पुनर्प्राप्तीसाठी कार्डिओ परमनरी दुखापत पेडिआट्रिक्स मध्ये दुखापत प्रतिबंधासाठी क्रीडा विकासत्माक समस्यांसाठी बालरोग शास्त्र आणि वृद्धांच्या पालकत्वाच्या समस्यांसाठी इकोवेरिंड पार्किंइडिया वैद्यकीय व्यवसायात रुग्णांच्या गरजांचे मूल्यांकन करणे त्यांच्यासाठी एक विशेष कार्यक्रम आखणे उपचार करणे आणि प्रगतीचा मागवा घेणे ही थेरपीस्ट ची मुख्य भूमिका असते थेरपीमध्ये तुम्हाला विविध साधने पाहिली आणि उपकरणे वापरली जातात जसे की गोनियो मीटर सांध्यांच्या हालचालीची व्याप्ती मोजण्यासाठी वापरले जाते अचूक आकडेवारी मिळाल्याने बरे होण्याच्या प्रगतीचा मागवा घेण्यास मदत होते थेराबँड आणि रेजिस्टन्स ट्यूब्स टप्प्याटप्प्याने स्नायू बळकट करण्यासाठी उत्तम वाहून नेण्यासाठी सोपे आणि विविध व्यायामासाठी वापरले जातात पॅरलल बार्स शस्त्रक्रियेनंतरच्या मज्जा संस्थेच्या विकारांनी ग्रस्त आणि तोल संभाळण्यास असमर्थ असलेल्या रुग्णांमध्ये चालण्याच्या प्रशिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे वापरली जाणारे साधने वॉकिंग adis कुबड्या काट्या आणि वॉकर यांच्या साधना मधून रुग्णांची योग्य साधनांची निवड करणे इलेक्ट्रोथेरेपी मध्ये टेन्स वेदना कमी करण्यासाठी आयएफटी वेदना सूज कमी करण्यासाठी अल्ट्रासाउंड टेंडरनेस आणि मसल री जनरेट करण्यासाठी मसल स्टीम्युलेटरस कुमकुवत स्नायूंना बळकट करण्यासाठी यासाठी कोणते साधन कधी वापरायचे आणि ते रुग्णाला समजून सांगून रुग्ण व्यवस्थितपणे बरा कसा करायचा हे यामध्ये थेरपिस्ट ठरवतो फिजिओथेरपी ही शरीर रचना शास्त्र आणि जैवयांत्रिकीवर आधारित आहे एक चांगला थेरपीस्ट ट्रीटमेंटचा प्लॅन असतो त्यामध्ये शरीराच्या कुठल्या भागावर ती इफेक्ट आहे सांध्याचा प्रकार कोणता सायनोव्हीयल सर्वात जास्त गतिशील कार्टिलेजिनस किंचित गतिशील फायबर्स स्नायूंच्या क्रिया आकुंचन प्रसारण अपवर्तन अभिवर्तन परिभ्रमण व्यायामाची निवड करण्यासाठी मुख्य प्रेरक स्नायूंची माहिती असणे आवश्यक आहे एक चांगला थेरपीस्ट बायो मेकॅनिक्स आपल्याला शिकवतो की योग्य संरेखन आणि उत्तोलना मुळे कार्यक्षमता वाढते आणि दुखापतीचा धोका कमी होतो व्यायाम थेरपी मध्ये व्यायाम उपचार हा पुनर्वसनाचा पाया आहे ऍक्टिव्ह एक्सरसाइज हे व्यायाम पूर्णपणे रुग्णाद्वारे केले जातात यांचा उपयोग स्नायू बळकट करण्यासाठी आणि हालचाल सुलभ करण्यासाठी होतो पॅसिव्ह एक्सरसाइज थेरपीस्ट रुग्णांचा अवयव हलवतो जेव्हा रुग्ण खूप अशक्त किंवा हालचाल करू शकत नाही तेव्हा याचा वापर होतो ऍक्टिव्ह असिस्टंट एक्सरसाइज हालचालीचे एकत्रित असे संयोजन जात थेरपिस्ट हालचालीच्या काही भागाला मदत करतात व्यायाम सुचवताना थेरपीस्ट एफ आय टी टी तत्वांचा विचार करून व्यायामाची फ्रिक्वेन्सी इंटेन्सिटी वेळ आणि त्याचा प्रकार अति वापरामुळे होणाऱ्या दुखापती टाळण्यासाठी प्रगती हळूहळू करण्यासाठी व्यायामाचा प्रकार नेहमी रुग्णांची स्थिती वेदनेची पातळी आणि बुद्धिसांची जुळवाजुळव करून थेरपीस्ट हा सांगत असतो इलेक्ट्रोथेरपीमध्ये थेरपी ही वेदना कमी करून रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंची क्रियाशीलता कशी वाढेल याकडे लक्ष देऊन वेदनांचे संकेत रोखण्यासाठी सवेदी न येतात उत्तेजित करते तीव्र आणि दीर्घकाळ वेदनांसाठी वापरले जाते आयएफटी अधिक खोलवर वेदना कमी करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी वापरले जाते मसल्सिमिनेशन कमजोर पक्षघात झालेल्या स्नायूंमध्ये आकुंचन घडवून आणते यामध्ये ठराविक गोष्टींचा विचार केला जातो पेसमेकर सक्रिय कर्करोग जंतुसंसर्ग गर्भवती महिला किंवा उघड्या जखमा यावर याचा वापर न करणे हे एक चांगला थेरपिस्ट समजू शकतो रुग्णांनी घ्यावयाची काळजी एक चांगला थेरीपिस्ट पारखण्यासाठी थेरपीस्ट हा योग्य मूल्यांकन करताच उपचार सुरू करू शकत नाही व्यायाम करताना रुग्णांच्या शरीराच्या स्थितीकडे लक्ष न देणे रुग्णांवर खूप जास्त व्यायामांचा भार टाकणे यामुळे केवळ प्रगती मंदावत नाही तर दुखापतीचाही धोका निर्माण होतो उदाहरणार्थ एखाद्या पेशंटची पाठ दुखत आहे वेदनेची पातळी सध्याची स्थिती हालचालीची व्याप्ती यांचे योजना आखूनच हळुवार हालचाल वाढवणे स्नायू बळकट करण्यासाठी प्रिकॉशन्स घेणे उपचाराची प्रगती पाहूनच दाबपट्टी वेदना मुक्त हालचाल करण्यास सांगणे त्यानंतर योग्य तो व्यायाम देणे हे एक नियोजनबद्ध काम आहे कोणत्या वयामध्ये कोणता व्यायाम करावा जसे की वीस ते तीस वर्षांमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग वर भरतेवा धावणे हिट सायकलिंग करणे एखाद्या खेळ खेळणे आठवड्यातून दोन-तीन वेळा स्ट्रेचिंग करणे 30 ते 40 वर्षातील रुग्णांनी स्नायू टिकवण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू ठेवावी चालणे जॉगिंग किंवा पोहणे कोर मजबूत करणारी व्यायाम करणे मोबिलिटी आणि स्ट्रेचिंगला वेळ द्यावा 40 ते 50 वयोगटातील रुग्णांनी सांध्यावर कमी ताण देणारे व्यायाम निवडावेत जलद चालणे सायकलींग किंवा पोहणे हलक्या ते मध्य मोजण्याचे स्ट्रेन ट्रेनिंग करणे योग्य आणि बॅलन्स चे व्यायाम करणे 50 ते 60 वयोगटातील रुग्णांनी रोज 30 ते 45 मिनिटे चालण्याची सवय ठेवावी हलक्या वजनांचे स्नायू मजबूत करणारे व्यायाम तसेच लवचिकतेसाठी योग आणि स्ट्रेचिंग संतुलन वाढवणारे व्यायाम नियमित करावेत रुग्णांनी घ्यावयाची काळजी फिजियोथेरेपी मध्ये वैज्ञानिक ज्ञान आणि रुग्ण केंद्रित काळजी यांचा संगम असतो नेहमी या क्रमाने पुढे गेल्यानंतर जसे की मूल्यांकन नियोजन उपाययोजना पुनर्मूल्यांकन आणि सुधारणा यामुळे रुग्ण व्यवस्थित बरा होतो त्यामुळे एक चांगला फिजिओथेरपीस्ट निवडणे हे रुग्णाचे काम आहे…..🙏🏻

आपलाच,
डॉ. मोहन पवार
शारीरिक चिकित्सक

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!