जिजाऊ सेवा संघ आयोजित पाककला स्पर्धे प्रसंगी मान्यवर, विजेत्या व पदाधिकारी
जिजाऊ सेवा संघाच्या उपक्रमास महिलांचा प्रचंड प्रतिसाद
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १३ ऑक्टोबर २०२६):-
बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघाच्या वतीने महिलां साठी नवरात्र निमित्त सोमवार दि.१२ सप्टेंबर रोजी पाक कला स्पर्धेचे आयोजन केले होते.
गोड पदार्थ बनविणे मध्ये
प्रथम डॉ. योगिता शिंदे शेरखान
द्वितीय स्वाती महामुनी ,तृतीय
सुषमा लोंढे,चतुर्थ वर्षा जाधव आणि
छाया पाटील,भावना धर्माधिकारी
मानसी दुरुगकर यांना अनुक्रमे पाच, सहा, सात क्रमांक मिळाला.
तिखट पदार्थ बनविणे स्पर्धेत
प्रथम सोनाली नेवसे ,द्वितीय सुप्रिया पाटील ,धनश्री राऊत ,चतुर्थ किरण जाधव आणि,दर्शना शहा , पुष्पावती भोसले, निकिता पानसांडे यांचा अनुक्रमे पाच, सहा, सातवा क्रमांक मिळवला

या प्रसंगी माजी नगराध्यक्षा जयश्री सातव,बारामती तालुका मराठा सेवा संघ अध्यक्ष नामदेव तुपे,बारामती बँक संचालक,देवेंद्र शिर्के व डॉ सुहासिनी सातव, विजया कदम, शारदा खराडे, सीमा चव्हाण, अंजली संगई, पाककलेचे परीक्षिका सुवर्णा जोशी, मोनिका आगवणे व
जिजाऊ सेवा संघ अध्यक्षा स्वाती ढवान ,व मनीषा शिंदे, सुनंदा जगताप, संगीता साळुंखे , कल्पना माने, भारती शेळके, मनीषा खेडेकर, गौरी सावळेपाटील ,वंदना जाधव, सुवर्ण केसकर ,ऋतुजा नलावडे ,विना यादव, पूजा खलाटे अमृता सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

नवरात्र मध्ये अनेक महिलांना उपवास असतात त्यामुळे उपवासाचे गोड,तिखट पदार्थ बनविण्याची कला कळावी ,तसेच अनेक नौकरदार, व्यवसायिक व अत्याधुनिक गृहणी महिलांना पदार्थ बनवण्यासाठी ऑनलाइन माहिती घ्यावी लागते त्यासाठी त्यांना पाक कलेचे ज्ञान मिळावे व महिलांच्या पाक कले मधील कला गुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून सदर पाक कला स्पर्धेचे आयोजन करत असल्याचे अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी सांगितले.
सदर स्पर्धेमुळे आत्मविश्वास वाढला व स्वतःला सादरीकरण करण्याची इच्छा पूर्ण झाली असल्याचे विजेत्या डॉ योगिता शिंदे व सुप्रिया नेवसे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन गौरी पाटील व संगीता साळुंखे यांनी केले तर आभार मनीषा शिंदे यांनी मानले

