अजितदादा यांच्या विचारांवर कार्य करणार :जय पवार

अजित दादा युथ फौंडेशन चे विक्रमी रक्तदान संपन्न

अजितदादा युथ फौंडेशन च्या महारक्तदान प्रसंगी जय पवार, अदिती तटकरे,सना मलिक व इतर (छायाचित्र: क्षितिज फोटो)

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी ,दि २५ जुलै २०२६(:-
स्व.अजितदादा बारामती च्या प्रत्येक श्वासामध्ये आहेत आपल्या आसपास त्यांचे विचार आहेत त्यामुळे बारामती चा विकास थांबनार नाही त्यांच्या विचारांवर या पुढील कार्य करणार असल्याचे राष्ट्रवादी चे सचिव व युवा नेते जय पवार यांनी सांगितले.
शुक्रवार दि.२४ जुलै रोजी, अजितदादा युथ फौंडेशन च्या वतीने महारक्तदान शिबिर प्रसंगी जय पवार यांनी प्रतिपादन केले.या प्रसंगी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे,आमदार सना मलिक शेख,नगराध्यक्ष सचिन सातव, नगरसेवक गोरख पारसे ,एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे,बिडा अध्यक्ष धनंजय जामदार,प्रा शशिकांत चौधर इतर मान्यवर उपस्तीत होते.


अजित दादा हे महाराष्ट्राला लाभलेले कोहिनुर हिरा असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले तर अल्पसंख्याक समाज्याला मुख्य प्रवाहात आणणारे अजितदादा खरे विकास पुरुष असल्याचे आमदार सना मलिक शेख यांनी सांगितले.
वृक्षारोपण, रक्तदान व समाजपयोगी कार्य हे दादांना अभिप्रेत होते तेच महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून अजितदादा यांना आदरांजली वाहत असल्याचे अजितदादा युथ फौंडेशन चे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी सांगितले.


नीट परीक्षेत देशात पहिली आलेली कु. श्रावणी कुदळे व श्रुती सूर्यवंशी, जानवी वीरकर, श्रुती शंकर करळे, आयुष करळे ,ओंकार हरनोळ,सार्थक रेपाल, ओम नरुटे, राहुल चौधर, केतन माने, ए. आय. आर्टिस्ट आदित्य शिंदे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
स्वागत दत्ता माने, राहुल चौधर, सचिन घाडगे, सुभाष चौधर, विनोद कचरे व इतर सहकारी यांनी केले तर सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले.या प्रसंगी २८९४ बाटल्या रक्तसंकलीत करण्यात आले.


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!