फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि १० ऑगस्ट २०२६):- फलटण ग्रामीण भागातील मांडवखडक, ता. फलटण गावचे हद्दीत हॉटेल बाणगंगाचे बाजूला संशयीत इसम रस्त्यावरील येणारे जाणारे लोकांना लुटणार असल्याबाबतची खात्रीशिर बातमी मा. राजकुमार भुजबळ, पोलीस निरीक्षक यांना मिळाली होती. त्याप्रमाणे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथक सदर ठिकाणी गेल्यावर ०५ संशयीत आरोपी दिसून आले. त्यांना पोलीसांची चाहूल लगताच पळून गेले. त्यावेळी पोलीस पथकाने ०२ किलोमिटर पाठलाग करुन ०५ आरोपीपैकी दोन आरोपींना ऊसाचे शेतामधून व कुरवलीच्या तलाव्याजवळून मोठ्या शिताफिने पाठलाग ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपींच्याकडून लुटमार व चोरी करण्यासाठी वापर करण्यात येणारा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपींच्याकडून ग्रामीण भागातील ब-याच चो-या उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे अधिक तपास चालू आहे.
आरोपी १. राहूल नाना घुले, रा. इंदीरानगर, मलटण, ता. फलटण, जि. सातारा, २. नंदकुमार भागोजी सोनवणे, रा. झिरपवाडी, ता. फलटण, जि. सातारा यांना अटक केली असून ०३ आरोपी फरार आहेत. सदर आरोपींच्या विरुध्द फलटण ग्रामीण स्टेशन गु.र. नंबर-४८२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फरारी आरोपींना पकडल्यावर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगीरी मा. निखिल पिंगळे सो, पोलीस अधीक्षक, मा. वैशाली कडुकर सोो, अपर पोलीस अधीक्षक, मा. धन्यकुमार गोडसे सोा, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक मा. राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत सुबनावळ, सहा. पोलीस निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोलीस हवालदार नितिन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस कॉस्टेबल हनुमंत दडस, तुषार नलवडे यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.

