सीबीएसई साऊथ झोन-२ स्पर्धेत फलटण च्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम (सीबीएसई) स्कूलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी….

१४ वर्षांखालील मुलींच्या संघाला तृतीय, तर १७ वर्षांखालील मुलींच्या संघाला द्वितीय क्रमांक; १७ वर्षांखालील संघाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

फलटण टुडे वृत्तसेवा (कर्नाटका,बिदर दि १० ऑगस्ट २०२६):- एडिफाय इंटरनॅशनल स्कूल, बीदर (कर्नाटक) येथे दि. ४ ते ८ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या सीबीएसई साऊथ झोन-२ स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल, सीबीएसई, जाधववाडीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

या स्पर्धेत पाच राज्यांतील सुमारे ६०० ते ७०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलच्,फलटण च्या एकूण १२ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

oplus_140509184

१४ वर्षांखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवीले. या संघात दिशा ढेंबरे, शिवश्री थोरात आणि तनिष्का अहिवळे यांचा समावेश होता.

तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावत दमदार कामगिरी केली. या संघात दिव्या ढेंबरे, आयेशा शेख,जान्हवी जाधव आणि जान्हवी पालखे यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, १७ वर्षांखालील मुलींच्या संघाची हरियाणा येथे होणाऱ्या सीबीएसई राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला आणखी मोठी झळाळी मिळाली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व खेळाडूंचे, क्रीडा मार्गदर्शकांचे व प्रशिक्षक सूरज ढेंबरे, सौ गेजगे यांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान विधान परिषद सदस्य आमदार मा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या नियामक मंडळाचे सदस्य,क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे , सदस्य प्रशासन अधिकारी अरविंद निकम,तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा , सुधीर अहिवळे, प्राचार्या सौ मीनल दिक्षित, उपप्राचार्या सौ स्नेहल भोंसले ,पर्यवेक्षिका सौ प्रियांका राऊत , सौ अर्चना धुमाळ तसेच शाळेच्या शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य यांनी अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!