शिष्यवृत्ती परीक्षेत सई निर्मला मनोज कदमचे उज्ज्वल यश; श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरची उज्ज्वल यशाचा परंपरा कायम

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १३ ऑगस्ट२०२६):- फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर, विद्यानगर, फलटण या शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात इयत्ता चौथीतील कुमारी सई निर्मला मनोज कदम (गिरवी) हिने स्पर्धा परीक्षेत ३००/२६८ गुण प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले व अव्वल स्थान पटकावले असून शिष्यवृत्तीधारक होण्याचा बहुमान मिळविला आहे.

सई कदम च्या या यशाबद्दल महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती मा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण , कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा सातारा जिल्हा परिषदे चे माजी अध्यक्ष मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, स्कूल कमिटीच्या चेअरमन श्रीमंत सौ शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, व्हाईस चेअरमन सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर, फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या नियामक मंडळाचे सदस्य, प्रशासनाधिकारी अरविंद निकम, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कोमल भोसले, मुख्याध्यापिका वैशाली जाधव, वर्गशिक्षिका सौ. रूपाली कदम, तसेच मार्गदर्शक शिक्षक सुरज चव्हाण, किरण मदने आणि सर्व शिक्षकवृंद व अनेक मान्यवर यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!